प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे दि १३ सप्तेंबर, यंदा पुणेकरांसाठी दिलासा दायक पाऊस झाल्यामुळे पुणे करांचा आनंद गगनात मावेना. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे पसिरसातील खडकवासला धरण ९७ टक्के भरलं आहे. पानशेत, भाटघर आणि वरसगाव धरणं १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९९ टक्के भरलं आहे. त्यामुळेच दरवर्षी पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या पुणेकरांना या वर्षी तरी पाण्याची चिंता करण्याची गरज लागणार नसल्याची चिन्हं दिसत आहेत.
खडकवासला मधून ६ हजार ८४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. विसर्गामुळे पाणी पातळी तुलनेने मोठ्या प्रमाणात वाढणार नसली तरी नदीकाठ परिसरात सतर्क राहावे, असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठीही सर्वत्र संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळेच कोयना धरणाचे दरवाजे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोयना काठच्या गावांना सतर्कचे इशारा देण्यात आलाय.
पुण्यातील धरणे किती टक्के भरली आहेत. ????
पानशेत – १०० %
वरसगाव धरण – १०० %
भाटघर – १०० %
टेमघर धरण – ९९ %
खडकवासला – ९७ %