वाहनतळाच्या ठिकाणी अधिकृत दरपत्रक न लावल्याने ठेकेदारास महापालिकेने २ लाख १४ हजार रुपयांचा दंड लावला

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी :

पुणे - मंडईतील बाबू गेनू (आर्यन) वाहनतळाच्या ठिकाणी अधिकृत दरपत्रक न लावल्याने ठेकेदारास महापालिकेने २ लाख १४ हजार रुपयांचा दंड लावला आहे. नागरिकांकडून तिप्पट पैसे वसूल करणे अरेरावी करणे यावर खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली असून, त्यानंतर आणखी दोन लाख रुपयांचा दंड लावला जाणार आहे.. त्यामध्ये दुचाकीसाठी प्रतितास तीन रुपये ऐवजी १० रुपये व चारचाकीसाठी प्रति तास १४ रुपये ऐवजी २० रुपये घेतले जात असल्याचे समोर आले. 

 या मुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने त्वरित पाऊल उचलत वाहनतळ चालकास नोटीस बजावली आहे. तसेच प्रतितास शुल्क किती आहे . याची व तक्रार कुठे करायची आहे  याची माहिती लिहिण्यात आली.या वाहनतळासाठी ठेकेदाराकडून महापालिकेला प्रतिमहिना सुमारे ४ लाख रुपये भाडे प्राप्त होते. त्याने महापालिकेने केलेल्या करारामध्ये जो दर निश्‍चीत केला आहे तेवढेच पैसे घेतले पाहिजेत,  तेथील कर्मचाऱ्यांनी चांगले वर्तन ठेवले पाहिजे, पण या सर्व अटींचा भंग झाला आहे. त्यामुळे लेखी समज देऊन मासिक भाडे रकमेच्या ५० टक्के दंड आकारण्यात येतो. 

दुसऱ्यांदा भंग केल्यास पुन्हा लेखी समज देऊन मासिक भाड्याच्या १०० टक्के रक्कम दंड म्हणून घेतली जाते. त्यानंतरही वर्तन सुधारले नाही व तक्रार आली तर करार रद्द करून महापालिका वाहनतळ ताब्यात घेते, असे करारात नमूद केले आहे. सदर ठेकेदारा विरोधात यापूर्वी एका नागरिकाने तक्रार केली होती, त्यानुसार ही दुसरी नोटीस असल्याने मासिक भाड्याच्या ५० टक्के रकमेचा दंड केला जाणार आहे. तर वाहनतळाच्या पहिल्या मजल्यावर दराचा तपशील न लिहिल्याने २ लाख १४ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

'महापालिकेने निश्‍चीत केलेला दरा नुसारच पार्किंग शुल्क घेतले पाहिजे तसेच दर किती आहेत याचा तपशील वाहन तळात लिहिणे बंधनकारक आहे. ठेकेदाराच्या कामगारांनी नागरिकांनी व्यवस्थित बोलले पाहिजे. याचे उल्लंघन केल्याने ठेकेदाराला नोटीस बजावून दंड लावला आहे.नागरिकांना वाईट अनुभव येत असल्यास त्यांनी न घाबरता कारवाई करावी, आमच्याकडून त्वरित कारवाई केली जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करू.''

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

या ठिकाणी तक्रार करा.....

- ९६८९९३१७१५, ९६८९९३१६७६ ९६७३७३८०८०

- ceproject@punecorporation.org

Post a Comment

Previous Post Next Post