प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे दि. मागच्या वर्षी टाळेबंदी मध्ये सगळे घरी असल्या मुळे काहीही क्राईम झाले नाही. पण आता सगळे खुले झाल्या पासून क्राईम वाढायला लागले आहेत. शहरात बलात्कारा चे प्रमाण वाढत आहे . त्यावर पण त्यांनी भाष्य केले आगामी काळात महिला सुरक्षिततेला अधिकाधिक प्राधान्य देणार असल्याचे सांगत वाढत्या गुन्हेगारीला पुढच्या तीन महिन्यात चाप लावणार असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता दिला.
पुणे शहरात रिक्षाचालकांकडून एका पाठोपाठ एक गुन्हे घडले आहेत.पोलिसांनी त्यातील आरोपींना तातडीने पकडले आहे. रिक्षा व्यवसायात काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक शिरले आहेत. या गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी,बेशिस्त प्रवाशी वाहतूकदारांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात रिक्षाचालकांची घृणता दुर्देवी असून त्यांच्याकडून होणारी अरेरावी आणि अडवणूक त्रासदायक ठरत आहे.त्यामुळे मस्तवाल आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी काही पावले उचलणार आहे, याचा प्रत्यय आपल्याला लवकरच दिसले. रेल्वे, एस टी, आरटीओ, ट्रॉफिक पोलीस, महापालिका, पीएमपी अशा सर्व प्रमुख घटकांच्या समन्वयाने दीर्घकालीन उपाय योजना आखणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
अमिताभ गुप्ता म्हणाले, महिलांची सुरक्षितता आणि दहशतवाद्यांचा बिमोड हे पोलिसांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शहरातील प्रवाशांशी संबंधित ठिकाणांबाबत एस टी, आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महापालिका अशा वेगवेगळ्या घटकांचा संबंध असतो. या सर्व घटकांशी बोलून आपण स्वत: संपर्क साधत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी होणारे महिलांवरील दुर्दैवी घटना रोखण्यासाठी या सर्व घटकांशी समन्वय साधून दीर्घकालीन उपाय योजना राबविण्यात येणार आहे. सध्या तातडीने आरटीओ व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांची तपासणी सुरु केली आहे. शहरात अनेक ठिकाणी निर्जन स्थळे आहेत. अशा ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटेल आणि गुन्हेगारांना संधी मिळू नये, यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यापासून अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. गुन्हेगारांवरील कारवाईबाबत गुप्ता म्हणाले, छोटे मोठे गुंड तलवारी,कोयते घेऊन केक कापणे, स्टेटस ठेवून दहशत पसरवत होते. तुम्ही समाजाचे वातावरण बिघडवत असाल तर ते खपवून घेणार नाही.अशा गुंडांना शोधून कारवाई केली. गुंडांचे रेकॉर्ड तयार करुन त्यांच्यावर एमपीडीए, मोक्का अशा कारवाई करुन गुन्हेगारी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील एक वर्षभराच्या कार्याबाबत आपण समाधानी असून अजून काम करायचे असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ.सुजित तांबडे उपस्थित होते.