प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे इंदापूर : महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनाचे इंदापूर शाखा चे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.नदिम भाई मुजावर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तालुका अध्यक्ष मा.अस्लम भाई शेख यांच्या कार्यकरणीतील कार्यकर्ते यांना नियुक्ती पत्र मा.नदीम भाई मुजावर यांच्या हस्ते देण्यात आले व विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष शहाबुद्दीन एम. शेख, संघटना खजिनदार इरफान शेख, सल्लागार सौ. आशा पाटोळे मॅडम, फारूख वकिल, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. सुलतान नाझा, महिला अध्यक्षा हाजरा कबीर, पुणे शहराध्यक्ष एजाज भाई सय्यद, कोर कमिटी सदस्य अब्बू भाई इनामदार, व्ही.एम. कबीर, बशीर शेख, कदीर शेख उपस्थित होते.
या प्रसंगी संघटनेचे प्रस्तावना मा.रफिक मुल्ला सर, सुत्रसंचलन संघटनेचे खजिनदार मा. इरफान शेख व आभार मा.अब्दुल रहेमान शेख यांनी मानले.