शिरूर पोलीस स्टेशनचे माजी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर ..कायदेशीर कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे ....भारत मुक्ती मोर्चा

 शिरूर पोलीस स्टेशनचे माजी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्या बेजबाबदार कारभारामुळे समाजला मोठ्या प्रमाणात अन्यायाला सामोरे जावे लागले.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे  : शिरूर :  अशा बेजबाबदार आणि समाज विघातक पोलीस अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे, आयपीसी व प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी *भारत मुक्ती मोर्चा*च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले,भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकार्याकडून अशी माहिती देण्यात आली 

शिरुर पोलिस स्टेशन येथील तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्या बेजबाबदार , मनमानी आणि अनागोंदी कारभारामुळे शिरूर तालुक्यातील शेकडो लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.! तालुक्यातील पत्रकार, वकील ,सामाजिक कार्यकर्ते, आंदोलनकर्ते, सामान्य नागरिक, व्यापारी आणि इतकेच नव्हे तर धर्मगुरूंचीही यांच्या ञासातून सुटका झाली नाही.या मुजोर आणि दंडेलशाहीच्या जोरावर एकप्रकारे खाकीच्या आडून गुंडेगिरी सुरू होती. पी आय खानापुरे यांच्या  माध्यमातून सर्वसामान्य पिडीत नागरिकांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करून प्रताड़ना केल्याची अनेक तक्रारी येत होत्या. कायद्याचा आपल्या सोयीप्रमाणे  आणि पदाचा गैरवापर करून अन्याय केला जात होता.नुकतेच पीआय खानापुरे यांची बदली होण्यापूर्वी मांडवगण फराटा येथील पीड़ित महिला आणि कुटुंबीयांना काही लोकांनी गंभीर स्वरुपाची मारहाण केली होती.त्याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी संबंधीत महिला शिरूर पोलीस स्टेशन येथे येऊन गैर तक्रारदारांच्या विरोधात तक्रार घेवून आली होती.  परंतु या मुजोर अधिकार्यांनी त्या महिलेची मदत करण्याऐवजी तिच्यावर आणि तिच्या मुलांवर गंभीर गुन्हे दाखल केले.

तद्नंतर भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांची भेट घेऊन सगळा प्रकार सांगितला व पी आय खानापुरे यांच्यावर आयपीसी व प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करून पोलीस विभागातून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली. परंतु आजतागायत  अधीक्षक पुणे ग्रामीण कोणत्याही प्रकारची  कारवाई केल्याचे  दिसून येत नाही या कारणास्तव भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती यांच्या द्वारे जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर बुधवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी एकदिवशीय धरणे प्रदर्शन करण्यात आले. या आंदोलनास बहुजनमुक्तीपार्टी यांच्या वतीने पाठींबा देण्यात आला. व संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी हुजनमुक्तीपार्टी चे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे , भारतमुक्तीमोर्चा  महाराष्ट्र प्रदेश  कार्याध्यक्ष सचिन बनसोडे, नानासाहेब चव्हाण राज्य उपाध्यक्ष भारतमुक्तीमोर्चा ,अमोलभाऊ लोंढे अध्यक्ष बहुजनमुक्तीपार्टी युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्र , बहुजनमुक्तीपार्टी शिरुर  तालुका अध्यक्ष फिरोजभाई सय्यद , समाधान लोंढे  युवाअध्यक्ष शिरुर तालुका, प्रोटान चे राज्यसचिव प्रा. सिद्धार्थ कांबळे, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती पुणे ग्रामीण  उपाध्यक्ष आम्रपाल नितनवरे , भारतीय पालक संघाचे नाथाभाऊ पाचर्णे आदी मान्यवरांसह शेकडो लोक आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post