प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे दि २१ सप्तेंबर कोंढवा हद्दित एका रिक्षाला धडक दिल्यावरून झालेल्या भांडनातून दोघांनी रिक्षा ड्रायव्हरवर खिशातून पिस्तुल काढून रोखल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली .त्यांच्याकडून पिस्तुल आणि एक जीवंत कडतुस जप्त करण्यात आले आहे. कोंढवे धावडे येथील पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री हा थरारक प्रकार घडला.
संदिप मोहन सावंत (वय 26, रा. इंदिरा वसाहत, उत्तमनगर) आणि स्वरूप संगपाल आवटे (वय 19, रा. धावडे बिल्डिंग, उत्तमनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यविरोधात कुडजेगांव येथील एका 28 वर्षिय रिक्षाचालकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोंढवे धावडे येथील पेट्रोल पंपावर उभा असलेल्या फिर्यादीच्या रिक्षास धडक दिली. फिर्यादींनी आरोपीला त्याचा जाब विचारल्यावरून संदिप सावंत याने त्याच्या जवळचे पिस्तुल बाहेर काढून फिर्यादीच्या छातीवर रोखले. त्यामुळे फिर्यादींनी तेथून पळ काढला. आरोपींनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना एनडीए पोलीस चौकीजवळ गाठले तसेच पुन्हा त्यांना शिवीगाळ करीत पिस्तुल अंगावर रोखून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच तेथे जमलेल्या लोकांनाही शिवीगाळ करीत दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
हा प्रकार पोलिसांना समजताच उत्तमनगर पोलिसांनी संदिप सावंत आणि स्वरूप आवटे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि काडतुस जप्त केले आहे. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक उमेश रोकडे हे करीत आहेत.