प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पुणे दि१० : मुलींवरील अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने ( आरटीओ ) नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे . परवाना व परमीट बॅज नसणे , पंधरा वर्षा पेक्षा जास्त कालावधीच्या रिक्षांचा वापर करणे वगैरे अशा प्रकारे ..नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नऊशेहून ... अधिक रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे . नुकतीच घडलेली पुणे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना ताजी असतानाच परत सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे , यामुळे शहरातील महिला सुरक्षितते बाबतचा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे .
एका घटनेत अन्य आरोपीं समवेत रिक्षाचालकाचा सहभाग होता ,तर दुसरी घटना रिक्षाचालकाने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे . याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर सरळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत . वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे व प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या उपस्थितीत दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली . या बैठकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले .
हल्ली असंख्य रिक्षा चालक विना लाईसेंस व बॅज नसलेले रिक्शा चालवणाऱ्यांची भर्ती झालेली दिसते , तर काही गुन्हेंगारी क्षेत्रातील नशा प्राशन करून रिक्शा चालवताना दिसुन येत आहे, तर काही स्टेशन परिसरात दिवसभर पढ़ीक राहुन जुगार,दारू असल्या कामात व्यस्त असतात व बाहेरून प्रवासी घेऊंन आलेल्या रिक्शावाल्याना येथे थांबू नका अशी दादागिरी ही करतात . तरी याबाबत दोषींवर कडक कारवाही करण्यात यावी . याचा परिणाम प्रामाणिक काम करणाऱ्या रिक्षा चालकांवर होत आहे. दुसरीकडे लॉक डाउन चा मार झेलनारे गरीब व गरजु रिक्शा वाल्याना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत वाहतुक विभागाने लाईसेंस व बॅजची सक्ति केली तरच रिक्शा व्यवसायात होणारी घूसखोरीवर आळा बसेल.