पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर दोषारोप निश्चीत झाले आहे .विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे , शरद कळसकर यांच्यावर आरोप निश्चिती झाली आहे.
आज अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होते बाकी आरोपी ऑनलाइन उपस्थित होते. दोषारोप निश्चित झाल्यानंतर आता खटला सुरु होणार आहे. पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावर आहे.
या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत. तर अॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून ॲड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत. आज पुणे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं.