लिव्ह इन रिलेशन’मधून जन्मलेल्या तेरा दिवसांच्या बाळाचा निर्दयी बापाने खून केल्याची खळबळजनक घटना अडीच वर्षांनंतर समोर आली.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे :  आश्रमात ठेवण्याच्या बहाण्याने या नराधमाने बाळाला आईपासून तोडले आणि मित्राच्या साथीने हे क्रुरकृत्य केले. अनेकदा विचारूनही बाळाची माहिती प्रियकर देत नाही, हे लक्षात आल्यानंतर 25 वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिसांकडे धाव घेतली होती. लिव्ह इन रिलेशन’मधून जन्मलेल्या तेरा दिवसांच्या बाळाचा निर्दयी बापाने खून केल्याची खळबळजनक घटना अडीच वर्षांनंतर समोर आली.

याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर शुभम महेश भांडे (वय 23, रा. वडगाव शेरी) व त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (वय 26, रा. मांजरी) यांना अटक केली होती. दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, आरोपींनी बाळाचा खून करून मृतदेह विमानतळ परिसरातील वनक्षेत्राच्या झाडीत ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, बाळाला गुंडाळून ठेवलेली चादर व त्याचे कपडे मिळून आले आहेत.

फिर्यादी तरुणी व शुभम हे 2017 पासून “लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत होते. 14 मार्च 2019 मध्ये तरुणीने ससून रुग्णालयात मुलाला जन्म दिला. याबाबत तरुणीने शुभम याला घरी सांगण्यास सांगितले.त्यावेळी त्याने घरचे आपल्याला स्वीकारणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे बाळाला अनाथाश्रमात ठेवणार असल्याचे सांगितले

तर, एका व्यक्‍तीनेदेखील हा प्रकार पाहिल्याची माहिती दिली आहे. पंचनामा करून पोलिसांनी कपडे व चादर जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post