प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे शहरातील नांदेड फाटा परिसरात असलेल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. ताज्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही महिला अजूनही कारखान्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे.
अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिलेंडरच्या स्फोटाचे आवाज कारखान्याच्या आतून सतत ऐकू येत आहेत. पुणे अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.30 च्या सुमारास आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही . घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल
Tags
Latest