सुप्रसिद्ध गायक अमर पुणेकर यांची लोक जन शक्ती पार्टी या राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे :  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे शिष्य, गायनाच्या माध्यमातून व सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्व कलाक्षेत्रात प्रसिद्ध असणारे गायक अमर पुणेकर यांची स्वर्गीय रामविलासजी पासवान यांच्या लोक जन शक्ती पार्टी या राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीपत्र लोक जन शक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शमीमभाई हवा यांच्या हस्ते देण्यात आले.

सदर प्रसंगी लोक जन शक्ती पार्टीचे पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट, पुणे शहर सरचिटणीस के.सी.पवार, लोक जन शक्ती पार्टी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड.अमीत दरेकर उपस्थित होते. 

अमर पुणेकर यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व कलाक्षेत्रात आनंद व्यक्त होत असून संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा येत आहेत तसेच अनेक ठिकाणी मित्रपरिवाराच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post