प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या १११ जागांसाठी पदभरती चालू आहे.या साठीची सूचना जारी करण्यात आली आहे. मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२१ आहे.
या पदांसाठी भरती
मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक
पात्रता आणि अनुभव
मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक BA, B.Sc , B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.
ऑफलाईन अर्ज,माध्यमिक विद्यालय आकुर्डी,उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी या पत्त्यावर पाठवावे.या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज https://www.pcmcindia.gov.in/ या वेबसाईटवर करु शकता .अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२१ असणार आहे.मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक १७,५००/- रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांची ८ सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत.