आगामी महापालिका निवडणुका :उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्या-मुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडचाही समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्या-मुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय.

तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या वक्तव्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जामार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिली आहे, असं अजित पवार म्हणाले. पालिका हाती असल्यास चांगलं काम होतं, असं अजित पवारांनी म्हटलंय.

Post a Comment

Previous Post Next Post