प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़ : हल्ली पिंपरी चिंचवड़ शहरी परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला दिसत आहे, मोटरसाइकलवतुन पाठीमागून येऊन हल्ला चढ़वत दागीने चोरट्यांचा प्रमाण वाढत आहे, अशीच एक घटना वाकड येथे घड़ली.
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर चोरट्याने वार करून तिच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ओमेगा सोसायटी, वाकड येथे घडली. रेखा ज्ञानेश्वर गिरमे वय 66, रा. पोस्टल कॉलनी, वाकड यांनी याप्रकरणी बुधवारी दि. 22 वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा गिरमे पहाटेच्या वेळी चालण्यासाठी गेल्या असताना अनोळखी चोरट्याने मागून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. रेखा यांनी चोरट्याला प्रतिकार केला असता चोरट्याने त्यांना मारहाण करून रस्त्यावरील वस्तूने मानेवर मारून जखमी केले. रेखा यांनी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.