प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी : दिल्ली पोलीस दलातील महिला कर्मचारी राबिया साबिया सैफी यांचेवर दि.3 सप्टेंबर 2021 सामूहिक अत्याचार करुन हत्या केली असुन त्या घटनेची न्यायालयीन चौकशी करुन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी. पीडित कुटुंबाला शासकीय नोकरी द्यावी व तसेच नुकसानभरपाई पोटी रक्कम ५ कोटी रुपये देण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटनांच्या वतीने देशातील 550 जिल्हा कचेरी व 5000 तहसील कचेरीवर देण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवार दि.14 सप्टेंबर 2021 रोजी पिंपरी तहसीलचे मा.तहसीलदार यांचे माध्यमातून महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा पिंपरी चिंचवड शहर युनिट प्रभारी सुनार गौस, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेकवर्क राज्य उपाध्यक्ष बाळासाहेव धावारे,बहुजन क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहर संयोजक दिनकर जाधव,सत्यशोधक मुलनिवासी वारकरी संघाचे राज्य प्रभारी सुरेश भालेराव, बहूजन मुक्ती पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी ,गोविंद हेरोडे, विजय आराख,महादेव लोखंडे,राजू वासनिक, समाधान आराख,बहुजन मुक्ती पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर युनिटच्या अध्यक्षा रजनी मिठबावकर, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघाच्या पिंपरी चिंचवड शहर युनिटच्या पदाधिकारी विमल हेरोडे व अनिता जाधव,शालिनी वरवडेकर,स्वराज्याचा जाहीरनामाचे मुख्य संपादक विशाल धेंडे,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहर युनिटचे पदाधिकारी हाजी हुसेन शेख, मुशीरखान पठाण, दौलत कुरेशी, सिकंदर मुलाणी व मुलाणी सर, RMBKS चे शहर संयोजक शैलेश शिंदे व ईतर समविचारी संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड विभागाचे मा.तहसीलदार यांना निवेदन देतांना पदाधिकारी व कार्यकर्ते