प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख:
पिंपरी-चिंचवड सह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिली होती. जून, जुलैच्या मध्यापर्यंत धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाण्याचे संकट वाढण्याची चिन्हे होती. पण, 18 जुलैनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. धुंवाधार पाऊस पडत होता. नदी नाले, ओढे तुडुंब भरुन वाहत होते. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील येवा वाढला. त्यामुळे अनेकवेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला. मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पवना धरण परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
पवना धरण 1350 क्युसेक विसर्ग वीज र्निमिती संचाद्वारे साेडण्यात आलेला आहे. चार वाजता सांडव्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे.
एकुण 3450 क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे. पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकानी सर्तक रहावे. धरणाच्या पाणलाेट क्षेत्रातुन येणारे पाण्याचे प्रमाण पाहुन विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.