प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
*पहिली घटना*
वाकड पोलिस हद्दी मधेअज्ञात चोरट्यांनी दरवाजा उचकटुन चोरी करून एक लाख 76 हजारांचा ऐवज एलएमपास केला ही घटना गुरुवारी दि.२३ सकाळी राजवाडेनगर, काळेवाडी येथे घडली. हा प्रकार केवळ दहा मिनिटात घडला आहे. वरूण शशिकुमार पिल्ले (वय २८, रा. राजवाडेनगर, काळेवाडी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
*दूसरी घटना*
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना एक घटना
लालसिंग भिकाजी राठोड व,४३ रा. दिघी रोड, भोसरी. मूळ रा. यवतमाळ यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास विश्वेश्वर चौक, भोसरी एमआयडीसी येथे तेजस अर्जुन तांगडे यांचा १५ हजारांचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला.
*तीसरी घटना*
चाकण मेदनकरवाडी येथे अष्टविनायक इंटरप्रायजेस नावाचे मोबाईल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ ते वाजताच्या कालावधीत घडली.दुकानातून बॅटरी, टच पॅड, मोबाईल डिस्प्ले, ब्ल्यू टूथ, पॉवरबँक, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह असा एकूण 48 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला
अतुल राजेंद्र भदाणे व, ३३, रा. वाकी खुर्द, ता. खेड यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,
*चौथी घटना*
खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे अंबिका माता मंदिराच्या गाभा-याबाहेर ठेवलेल्या दान पेटीतून दोन अनोळखी चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
संतोष मल्हारी शेटे वय 46, रा. साबळेवाडी, ता. खेड यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.