प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी-चिंचवड पोलीस राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्राईम ट्रेंडची आकडेवारी काढत आहेत. प्रत्येक गुन्ह्याच्या बाबतीत मागील तीन ते पाच वर्षातील हॉटस्पॉट देखील शोधले जात आहेत. कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे होतात याचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतींचाही अभ्यास केला जात आहे. भविष्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी याची पोलिसांना मदत होणार आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा मागील तीन आठवड्यांपासून या कामी लागले आहेत.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले की.....
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड महापालिका, चाकण नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, तळेगाव नगरपरिषद या भागांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हद्दीतील निर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पथदिवे बसविण्यासाठी सांगितले जाणार असून भविष्यात स्मार्ट पोलिसिंगवर भर दिला जाणार ,,