प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड़ दि. 5 सप्तेंबर केवायसी अपडेट करून देतो असे भासऊन बहाण्याने लिंक पाठवून बँकेच्या खात्यातील दोन लाख 25 हजार रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार शनिवारी ४ दि दुपारी दोन ते तीन दरमियान बावधन येथे घडला.
मनीष अवधेश आनंद वय 42, रा. बावधन, पुणे यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तकरार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात इसमा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईलवर केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठविली. त्यानंतर मोबाईल अॅपच्या मदतीने फिर्यादीच्या वडिलांच्या खात्यातील दोन लाख 25 हजार रुपये काढून घेऊन अज्ञात आरोपीने पैशांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.साइबर गुन्हे फार वाडत आहे तरी सतरकेचा इशारा देत हिंजवडी पोलीस पुढिल तपास करीत आहेत.