प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवर अली शेख :
पिंपरी चिंचवड़ : सप्तेंबर निगडी तीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी निगडी येथे केली.
पोलीस हवालदार जालिंदर ढोले यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून तीन मुलींची सुटका केली. या मुलींकडून आरोपी महिला वेश्या व्यवसाय करवून घेत होती. त्यातून मिळणारे काही पैसे आपल्याकडे ठेवून उपजिविका भागवत होती. निगडी पोलीस तपास करीत आहेत.