अपघात वृत्त : देहूरोड आणि चाकण परिसरात वेगवेगळे दोन भीषण अपघातत दोन व्यक्तींचा मृत्यु .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

पिंपरी चिंचवड़  : देहूरोड आणि चाकण परिसरात दोन भीषण अपघात झाले. या दोन्ही अपघाता मध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बुधवारी   देहूरोड आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत,

 पहिल्या घटनेत, इरफान नुरमोहम्मद नैसर्गी वय 38, रा.  ओटा स्कीम निगडी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून एका अनोळखी व्यक्तीला जोरात धडक देऊन अपघात केला असून या अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी  रात्री साडेदहाच्या सुमारास गार्डन सिटीसमोर  पुणे मुंबई हाइवे रास्ता देहूरोड येथे घडली. देहूरोड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

 दुसऱ्या  घटनेत  चाकण पोलीस ठाण्यात अनिल फकिरा खंडारे वय 27, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. वाशीम यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मित्र नितेश मधुकर जाधव वय 22, रा. निघोजे. ता. खेड यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.  याप्रकरणी कंटेनर (एम एच 06 / ए क्यू 6176) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र मयत नितेश जाधव मंगळवारी  दुपारच्या सुमारास दुचाकीवरून महाळुंगे येथून जात होता. त्यावेळी आरोपी कंटेनर चालकाने भरधाव वेगात कंटेनर चालवून नितेशच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. कंटेनर नितेशच्या अंगावरून तसेच दुचाकीवरून गेल्याने त्याखाली चिरडून नितेशचा मृत्यू झाला. चाकण पोलीस पुढ़िल तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post