प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुका त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार शिक्का मोर्तब,ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता,
राज्य सरकारने सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करत मुंबई वगळता १७ महापालिकांच्या निवडणुका तीनसदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत तीन नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीनेच निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार असल्याचे निश्चित झाल्याने संदिग्धता संपली आहे.
४३ प्रभागांपैकी २३ प्रभागात दोन महिला तर एक पुरुष उमेदवार अशी विभागणी असणार आहे. १२८ नगरसेवकांपैकी ६२ पुरुष तर ६६ महिला नगरसेविका असणार आहेत. दरम्यान, चार महिला नगरसेविकांची संख्या जास्त राहणार आहे, त्यामुळे त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीचा महिलांना फायदा होणार आहे.
त्याबाबतचा अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे देखील पाठविण्यात आला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेची संदिग्धता संपली असून निवडणूक विभागाने कामाला गती दिली. तळवडे गावठाणापासून नव्याने प्रभाग तयार करण्यास सुरुवात झाली. सांगवीत प्रभाग रचनेचा शेवट होईल. सांगवीतील शेवटचा प्रभाग २ सदस्यांचा राहू शकतो. २५ सदस्यांची समिती प्रभाग रचनेचे काम करत आहे. गुगलमॅपद्वारे सीमांकण केले जात आहे.,
*मागील काळात पार पडलेल्या पिंपरी चिंचवड महा पालिकेच्या निवडणुकीचा इतिहास*
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी तीन सदस्यीय पॅनेल पद्धती नवीन नाही. २००२मध्ये याच पद्धतीने निवडणूक पार पडली होती.
यानंतर २००७ मध्ये एकसदस्यीय वार्ड पद्धती अमलात आली,
तर २०१२ मध्ये दोन सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्यात आली होती.त्यानंतर सन २०१७ साली चारसदस्यीय पॅनेलनिहाय निवडणूक झाली.