प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
*पहिली घटना*
पिंपरी हद्दीत चोरांचे थैमाण चक्क अढीच हजार किलोचे पाईप चोरांनी पळविली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादी सातव यांना आपल्या व्यावसायासाठी पाईप लागत असल्याने 2२ लाख १४ हजार ४८० रुपये किमतीचे २ हजार ६५३ किलोचे पाईप घराजवळ आणून ठेवल होते. अज्ञात चोरट्यांनी ते चोरून नेले. ही घटना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पिंपरी गाव येथे घडली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
*दुसरी घटना*
चिखली येथे मेश्राम यांनी त्यांची एक लाख ३० हजार रुपये कीमतीची दुचाकी २४ सप्टेंबर रोजी सकाळी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार २८ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
अमित विनायक मेश्राम (रा. कृष्णानगर, शांती सदन सोसायटी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिखली पोलीस तपास करीत आहेत.
*तिसरी घटना*
कंपनीतून सुटल्यानंतर पायी घरी निघालेल्या कामगाराच्या हातातील मोबाईल दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसकावून नेला. ही घटना २७ सप्टेंबप रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास शिवतेज हॉटेलजवळ डोंगरवस्ती निघोडे येथे घडली.
दीपक रामफल दास वय २९. रा. डोंगरवस्ती, निघोजे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवर आलोल्या तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलिस करत आहे.