प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवड़ महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कक्षात भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी जोरदार आंदोलन केले. त्यांच्यासोबत काही महिला कार्यकर्त्याही सहभागी होत्या.
कासारवाडी याठिकाणी भर पावसाळ्यात आयुक्तांनी खोदकाम सुरू केल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला. यावेळी आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकत त्यांनी निषेध व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत महिला कार्यकर्त्यांसह नगरसेविका आशा शेंडगे यांना ताब्यात घेतले
Tags
Latest