प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड़ दि. ३ पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच थैमान घातला आहे. घरा समोरील, सोसायटीच्या पार्किंग मधील, व सार्वजनिक ठिकाणी उभी केलेली वाहने चोरून चोरटे भूरटे पसार होत आहेत. भोसरी, चाकण, पिंपरी, चिखली आणि तळेगाव दाभाडे परिसरातील सात दुचाकी तर हिंजवडी मधून एक ट्रक चोरीला गेल्याच्या घटना क्षेत्रात उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत.
Tags
Crime