प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड : भारतातील जग प्रसिध्द मुस्लिम समाजातील अभ्यासक मोलाना कलीम सिद्दीकी साहेब,व इतर विचारवंतांना, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक ATS यांनी बेकायदेशीर रित्या सुधबुद्धीने अटक केली आहे .
या अटकेच्या निषेधार्थ रविवारी २६सप्टेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी चिंचवड येथे जमियेत उलेमा हिंद पिंपरी चिंचवड च्या वतीने विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यात आले, त्या वेळी,जमियेत उलेमा पिंपरी चिंचवड अध्यक्ष हाजी गुलजार साहेब,महा सचिव कारी इकबाल उस्मानी साहेब,जमियेत उलेमा देहूरोड अध्यक्ष हाजी मुशीर खान पठाण,मौलाना उमेर गाजी,हाफिज अन्वरअली शेख,शरीफ खान,मौलाना आलीम साहेब, धम्मा साळवे साहेब,अजीज शेख,व विविध सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम जन समुदाय उपस्थित होता,