प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पिंपरी चिंचवड़ :वंश पुड़े चालविन्यासाठी आम्हाला मुलगा पाहिजे होता परंतु तुला मुलगी झाली.तू अपशकुनी आहेस , तसेच इतर कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना यमुनानगर, वाकड येथे घडली.
पती सचिन गौतम बोकेफोडे वय 37 सासरे गौतम विठ्ठल बोकेफोडे वय 60, सासू आणि नणंद (सर्व रा. यमुनानगर, वाकड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत 25 वर्षीय विवाहितेने शनिवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2011 ते 11 सप्टेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडली.
आम्हाला मुलगा पाहिजे होता परंतु तुला मुलगी झाली, या कारणावरून टोचून बोलत फिर्यादी यांचा छळ केला, एप्रिल 2021 पासून पती फिर्यादी विवाहिता आणि त्यांच्या दोन मुलांना सोडून दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. तसेच घरभाडेही भरले नाही. फिर्यादी यांच्या घरात राशन न भरल्याने त्यांच्यावर उपास मारी करावि लागत आहे,