क्राईम न्यूज : तोतया एसीपी ने शिक्षिकेवर वारंवार बलात्कार केल्याची घटनेने खळबळ , सांगवी पोलिस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड़ दि १२ सप्तेंबर सांगवी : शिक्षिकेला शीतपेये मधून गुंगीचे औषध पाजून तोतया एसीपी ने शिक्षिकेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या बाबत सांगवी पोलिस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 

आरोपी विकास अवस्थी रा. डायनासोर गार्डन जवळ पिंपळे गुरव हा स्वतःला निवृत्त एसीपी सांगत असला तरी त्याचे किराणा मालाचे दुकान आहे आणि तो व्याजाने पैसे देतो. शिक्षिकेला एकदा पैशाची गरज पडली असता ती विकास अवस्थेकडे गेली त्यावेळी अवस्थी पिडीताला त्याच्या पिंपरी गुरव येथील घरी बोलावून  आरोपीने शिक्षकेचे २ कोरे धनादेशावर हस्ताक्षर करून घेतलं. त्यानंतर शीतपेया मधून तिला गुंगीचे औषध दिले. त्या नंतर विवस्त्र करून तिचे आक्षेपहार्य फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत होता. तिला व्याजाने पैसे देखील दिले नाहीत. शेवटी शिक्षिका तक्रार द्यायला घाबरत होती. एक दिवशी थेट शिक्षिका ज्या शाळेत काम करती अवस्थी तेथे जाऊन शिक्षकेला बाहेर बोलवुन काढलेल्या चित्रफित दाखवून दमबाजी केली जर हे गोष्ट कुणाला सांगितले तर तुला व तुझ्या घरच्या लोकांना ठार मारीन असे दम देत परत आपल्याला घरी दुचाकीवरून घेऊन गेला परत शिक्षिकेवर अत्याचार केला. परंतु वारंवार हे घडत असल्याने तिने शेवटी सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

विकास अवस्थी याच्या विरोधात बलात्कार, खंडणी तसेच सावकारी विरोधी अधिनियम कायदा अन्वये गुन्हे दाखल झाले . सांगवी पोलिसांनी विकास अवस्थीला घरातूनच अटक केली. या घटनेचा अधिक तपास उपनिरिक्षिका कविता रूपनर करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post