प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड़ ; दि ३ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पीएमपीच्या बसमधून प्रवासाकरिता दैनिक पास आता अवघ्या ५० रुपयांत मिळणार आहे . फक्त पुणे शहरात दिवसभर प्रवास करायेचे असल्यास दैनिक पास ४० रुपयांना मिळणार असून आणि पिंपरी - चिंचवडमध्ये प्रवासासाठी फक्त ४० रु. एक दिवसाचा पास मिळणार आहे . पीएमपीच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने
पीएमपीचा दैनंदिन प्रवासाचा पास सध्या ७० रुपयांना आहे . त्याची किंमत कमी केली आहे . त्यानुसार आता पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरांत प्रवाशांना ५० रुपयांना पास मिळणार आहे . त्यासाठीचा मासिक पास आता फक्त १२०० रुपयांना मिळेल .
दैनंदिन पासचे दर महापालिका हद्दीत ..४० रु . दोन्ही महापालिका हद्दीत ..५० रु . हद्दीबाहेर ७० रु . मासिक पासचे दर एका महापालिका हद्दीत .. ९ ०० रु . दोन्ही महापालिका हद्दीत ..१२०० रु . पीएमपीच्या कार्यक्षेत्रात ..१४०० रु . पुणे शहरात प्रवास असल्यास ४० रुपयांत दिवसाचा पास मिळेल . त्याच पिंपरी चिंचवड शहरात फिरायचे असल्यास दैनिक पास ४० रुपयांना मिळेल , अशी माहिती सूत्रा कढ़ून प्राप्त झाली आहे