प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दापोडी येथील चौकातील हायवे स्थित पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे शेंडगे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आगरवाल, संजय गोडांबे, गणेश आटोळे, संजय शेडगे, अनुप लुंकड तसेच फामिदा शेख, आयेशा अन्सारी आदी उपस्थित होत्या.
क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांची आज मंगळवारी, दि.२८ रोजी जयंती साजरी होत आहे. आज शहीद आझम भगतसिंग यांची ११४ वी जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिश सरकारने २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली होती.