प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़ दि २३, दिवसे दिवस महिलांवर अत्याचराचे प्रमाण वाढतच आहे, त्यावर प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना करणे आज काळाची गरज आहे, तरुणी व महिलांच्या बाबतीत घरगुती हिंसा हल्ली वाढतच आहे त्यावर पायबंद घालण्यासाठी व इतर दुर्देवी घडणाऱ्या घटना संबंधी विविध उपाय योजनांसह महिलांशी संबंधित कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, या बाबतचे निवेदन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिले.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, भाजपा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला गावडे, कविता हिंगे, गीता महेंद्र, शोभा भराडे, आशा काळे, पल्लवी वाल्हेकर, सोनम मोरे, वैशाली जवळकर आदी उपस्थित होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, “शहरात लहान मुली आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी आम्ही सर्व महिला एकत्र आलो आहे. अन्यायाचा चढता क्रम आहे. त्याचा उतरता क्रम दिसायला पाहिजे. पोलीस आयुक्तांना आणि पोलीस यंत्रणेला खूप काम करावं लागणार आहे. खाकीच्या दहशतीचा वापर करणे फार गरजेचे आहे.
मागील काही दिवसांपूर्वी महापालिका आणि पोलिसांची बैठक झाली. त्यात पोलिसांना सांगण्यात आले होते कि, सर्वसाधारणपणे अंधाराचा परिसर, गार्डन, निर्जन ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असतात. अशा ठिकाणांचा शोध घेऊन तिथे कॅमेरे बसवण्याबाबत पोलिसांनी पत्र द्यावे. जर सीसीटीव्ही बसवण्यामुळे महिलांवरील अत्याचार कमी होणार असतील तर आम्ही सगळे निश्चित मदत करू. असे आश्वासन देखील महापौरांनी दिले आहे.