सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले मला नेता व्हायचे नाही

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड : मी पोलीस आयुक्तालयाचे नेतृत्व करतो आहे. पण मला नेता व्हायचे नाही. तसेच मला सेलिब्रेटीही व्हायचे नाही. चांगले काम करुन प्रसिध्दी मिळतेच, असे प्रतिपादन पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी केले.

सर्व पक्ष आणि मानिनी महिला मंडळाच्यावतीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते नागरी सत्कार आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आला. 

सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, समाजकंटकांचे निर्दाळण करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. पोलीस आणि नागरीक एकत्र येऊन आणखी चांगले काम करु शकतात. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र पुण्यापेक्षा मोठे आहे. परंतू कर्मचारी संख्या कमी आहे. खाकी वर्दी हा पोलिसांचा धर्म आणि कर्तव्य आहे. मी कर्तव्याचे पालन करणारा असून मागील वर्षात 4700 नागरीकांना मी भेटलो. त्यामुळे मला माणूस ओळखता येतो. गौतम बुध्दांनी सांगितल्याप्रमाणे “मै कोई बात करता हू उसपे विश्वास मत करो, मगर ये बात आपके बुध्दी, मन को सही लगे तो ही विश्वास करो’ याप्रमाणे मी वागतो.

आयुक्‍त पुढे म्हणाले, लोकशाही आणि लोककल्याणकारी राज्यामध्ये पोलीस प्रशासन दबाव टाकणारी किंवा लगान वसूल करणारी यंत्रणा नाही. मी सत्याच्या शोधात आहे. ते सत्य शोधता-शोधता सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटना, बातमीदार आणि समाजातील जबाबदार नागरीकांचे मी जाळे जोडले. त्यांच्या माध्यमांतून मला माहिती मिळत गेली आणि माझ्या कल्पनेप्रमाणे काम करीत गेलो. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चांगले काम करता आले.

मी एक लोक प्रतिनिधि आहे म्हणून माझा जो सत्कार आहे हा तुमचाच सत्कार आहे

Post a Comment

Previous Post Next Post