प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़ :चंद्रशेखर पात्रे यांचा ५५वा वाढदिवस विविध,पक्ष,संघटनांच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यांचे वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब प्रवेशद्वार कमानी समोर आयोजित कार्यक्रमात कामगार, राजकीय, सामाजिक, चळवळीतून सध्या मानव अधिकार चळवळ व पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करून कार्यात उत्तूंग भरारी मारणारे ,चंद्रशेखर पात्रे यांच्या ५५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात सन्मानाला उत्तर देताना चंद्रशेखर पात्रे बोलत होते.
प्रारंभी धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष के.एच.सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात फुले,शाहू, आंबेडकरी, चळवळीत आपल्या माथ्यमातुन योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची सामाजिक जाणीव व त्यांच्या कार्याला आणखी गती व प्रेरणा,स्फुर्ती मिळावी या उद्देशाने धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्था ज्या कार्यकर्त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा जीवन गौरव पुरस्कार ,प्रदान करून त्याचा उचीत सन्मान करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो.
त्याच उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रशेखर पात्रे यांचा जीवन गौरव पुरस्काराने त्यांनी केलेल्या व करीत असलेल्या कार्याचा गौरव करण्यात येत असल्याचे सांगुन त्यांनी जीवन गौरव पुरस्काराचे वाचन केले. या ठिकानी सर्व पक्ष व विविध सामाजिक संस्था,संघटनेचे अधिकारी पद अधिकारी व कार्यकार्ते उपस्थित होते. होते,