क्राईम न्यूज : चारित्र्यावर संशय घेऊनपति ने पत्नीला चाकूने भोकसले



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवर अली शेख : 

 पिंपरी चिंचवड़ दि. ७ सप्तेंबर वाकड हद्द पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटात चाकू खुपसून तिला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी रात्री जगताप नगर, थेरगाव येथे घडली.

धनंजय सिद्धेश्वर वाघमारे वय ४०, रा. जगतापनगर, थेरगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पती-पत्नी आहेत. आरोपीने फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन जाब विचारत मार हान केली व घरातील भाजीपाला कापण्याच्या चाकूने फिर्यादी यांच्या पोटात खुपसून गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस  पुढ़िल तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post