प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड महाराष्ट्रात आपली सत्ता आहे. मात्र, या भागात पालकमंत्री अजित पवार आमचे ऐकत नाहीत, अशी शिवसैनिकांची तक्रार आहे; पण मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे पवार यांनी आमचेही थोडे ऐकावे; अन्यथा गडबड होईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी दिला. दरम्यान, वडगाव शेरी येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. २०२४ नंतरही मुख्यमंत्रिपदी तेच असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना पदाधिकार्यांचा मेळावा भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की, आपली ओळख आपण निर्माण केली पाहिजे. दिल्लीतील माझा पत्ता सांगताना मोदी माझ्या घरासमोर राहतात, असे मी सांगतो.