प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पिंपरी चिंचवड :हक्कसोडपत्राची आणि मृत्यूपत्राची सात-बारावर नोंद घेण्यासाठी चर्होली बु्द्रु च्या तलाठ्याने 30 हजारांची लाच घेतांना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला . या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जवळील मृत्युपत्राची व हक्कसोडपत्राची नोंद सातबारा सदरी घेण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी तलाठी मारूती पवार याने मृत्यूपत्राची आणि हक्कसोडपत्राची नोंद सातबा-यावर घेण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली, त्यानंतर तडजोड करून ३० हजार रुपये देण्याचे ठरले.
मारूती अंकुश पवार वय ४१ असे रंगेहाथ पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तलाठ्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दि. २७, दुपारी च-होली येथे करण्यात आली.