प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड़ दि. 5 सप्तेंबर , देहूरोड, गांजा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक. तरुणाकडून 51 हजार 250 रुपये किमतीचा दोन किलो 20 ग्रॅम गांजा तसेच 50 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण एक लाख एक हजार 250 रुपयांचा मुद्देमाला सह आरोपी अटक, आरोपीसह त्याला गांजा पुरवणा-या विरोधात देखील गुन्हा दाखल.
नानासाहेब विष्णू महापुरे (वय 28, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. माहीम, पाटील वस्ती रस्ता, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी दिनकर परशुराम भुजबळ यांनी या प्रकरणी शनिवारी (दि. 4) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
माहितीनुसार, आरोपी महापुरे हा कीवले मुकाई चौकाकडून आदर्श नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विक्रीसाठी गांजा घेऊन जात असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. 4) दुपारी पावणे दोनच्या सुमारास कारवाई करून महापुरे याला अटक केली,देहूरोड पोलीस पुढ़िल तपास करीत आहेत.