प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पिंपरी चिंचवड़ दि१९ चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन नरधामाने मिळून एका अल्पवनीय 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केला.मुलगी गरोदर राहिली त्यानंतर मुलीने बाळाला जन्मही दिला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेच्या 12 वर्षीय मुलीवर जबरदस्तीने व आळीपाळीने बलात्कार केला. हा प्रकार डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत चाकण जवळ घडला. यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
अक्षय पराजो खडे वय 20, रा. आंबेगाव, सुनील मधे रा,खेड, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अक्षय याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.