प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड़ पुणे ही शहरे जगभरातील प्रमुख आयटी हबपैकी एक आहेत. पिंपरी-चिंचवड मध्ये देशातील सर्व बड्या आयटी कंपन्यां आहेत. तसेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये देखील आहेत. शेकडो लहान-मोठ्या आयटी कंपन्या लाखो आयटीयन्सला येथे रोजगार मिळतो.
करोना काळात जेव्हा जगभरात सर्वच उद्योग क्षेत्रांवर विपरीत परिणाम होत होते आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या , भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार देणार असल्याच्या घोषणा केल्या. परंतु अजूनही घोषणांप्रमाणे नियुक्त्या होत नसल्याचे दिसून येत आहे.
देशातील टॉप चार कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा केली होती. रोज किमान तीनशे आयटीयन्सला नोकरी मिळायला हवी होती. परंतु तसे होतना दिसत नाही. अनेक आयटीयन्स अजूनही बेरोजगार आहेत. कंपन्यांनी केवळ सरकारी सवलतींसाठी या घोषणा केल्या होत्या का? अशी शंका उपस्थित होत आहे.
या सर्व घोषणा पाहता दोन ते तीन लाख आयटीयन्सला नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यात 75 टक्के अनुभवी आणि 25 टक्के नवीन आयटीयन्सला नोकरी मिळणार होती. या घोषणांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या आयटी क्षेत्रात चैतन्य पसरले. मध्यंतरीच्या काळात जावा डेव्हलपर्स सारख्या आयटीयन्सची मागणीही वाढली. त्यांना पगारात मोठी वाढही मिळू लागली. हे दृश्य पाहता आयटी कंपन्यांच्या घोषणा खऱ्या होण्याच्या शक्यतांना आणखीनच बळ मिळाले. परंतु सप्टेंबर महिना उजाडला तरी अजूनही तशा नियुक्त्या होताना दिसत नाहीत. शहरातील आणि बाहेरुन शहरात येऊन थांबलेल्यांची प्रतीक्षा वाढतच चालली आहे.