पिंपरी चिंचवड़ मधे विविध विकास कामांसाठी 5 कोटी 83 लाख इतक्या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिके मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी आरक्षण क्रमांक 77 येथे निवासी गाळे बांधण्यासाठी ,1 कोटी 45 लाख 14 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली . प्रभाग क्रमांक 6 मध्ये पूर्व भागात खड्डे व रस्त्याचे डांबरीकरण करण्याकामी,27 लाख 28 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली . वैद्यकीय विभाग कोविड -19 कामकाजाकरीता शासनाकडील नोंदणीकृत संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्या साठी 50 कोविड लसीकरण केंद्रा साठी 50 स्टाफनर्स 25 डेटाएन्ट्री ऑपरेटर 25 वॉर्डबॉय वार्डआया असे एकूण 100 कुशल अकुशल मनुष्यबळाची 2 महिने कालावधी करीता करारनामा करुन नेमणूक करण्याकामी  50 लाख 81 हजार  खर्चास मान्यता देण्यात आली .

प्रभाग क्रमांक 16 वाल्हेकरवाडी येथे प्राधिकरण कडून आलेल्या जागेवर शाळा इमारत बांधण्यासाठी 9 कोटी 61 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली . महापालिकेचे अ , ब , क  , ड ,  इ ,  फ  ग ,व , ह , क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते /गटारे सफाई कामा साठी किमान वेतन दराने कामगार उपलब्ध करणे याकामासाठी 2 वर्ष कालावधीसाठी किमान वेतनावरील सेवा शुल्कावर निवेदन मागविण्यात आली होती . त्यानुसार 8 क्षेत्रिय कार्यालयाकडे किमान वेतन दरानुसार 6 संस्थांमार्फत 1529 सफाई कामगार पुरविण्यात आलेले आहे . त्याकामासाठी 7 कोटी 10 लाख खर्चास मान्यता देण्यात आली .

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  50 लाख 30 हजार , ग प्रभागातील जलनि : सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने सफाई  कामासाठी  1 कोटी 16 लाख इतक्या खर्चास , ड प्रभागातील जलनि : सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने सफाई कामासाठी 32 लाख 77 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली .

प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी मधील लोकमान्य टिळक शाळा विस्तारीकरण  साठी 2 कोटी 58 लाख , प्रभाग क्रमांक 20 मधील महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी समोरचा नाला विकसित करण्याकामी येणाऱ्या 1 कोटी 14 लाख , संत ज्ञानेश्वर उद्यान प्राधिकरण निगडी देखभाल साठी 44 लाख 73 हजार , प्रभाग क्रमांक 10 मधील शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागे शाहू सृष्टीचे उर्वरित कामे पूर्ण करण्या साठी 5 कोटी 55 लाख  खर्चास मान्यता देण्यात आली .

महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांमध्ये MPLS द्वारे इंटरनेट कनेक्टीव्हिटी करण्या साठी 68 लाख 21 हजार , महापालिकेच्या विविध रुग्णालये , कोविड सेंटर ई . ठिकाणी कोरोना विषाणुबाधित रुग्णांवर उपचारा साठी 81 लाख 50 हजार , प्रभाग क्रमांक 30 दापोडी कासारवाडी मधील रेल्वेगेट सर्वे नं .498 ते सर्वे नं . 485 पर्यंत रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करने1 कोटी 19 लाख 28 हजार  खर्चास मान्यता देण्यात आली .

Post a Comment

Previous Post Next Post