प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़, दि.१६ पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई वडील गावी गेले असता, अवध्या १४ वर्षाच्या शाळकरी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. रिचा दिलीप देवकर वय १४ असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. रिचाने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. येरवडा परिसरात हळ हळ व्यक्त केले जात आहे,येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रिचाने घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे आढळले. तिला तातडीने खाली उतरून ससून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी पाहणी केली असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.