प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड; दि ७ सप्तेंबर महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत कोरोना काळात ज्या महिलांचे पती कोरोना आजराने बाधित होऊन मृत्यू पावले आहेत, अशा विधवा महिलांना महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत रु. २५,०००/- चे अर्थसहाय्य मंजुर केले जात आहे. सदर योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय ५० वर्षे पर्यंत असावे अशी अट नमुद केलेली आहे, परंतु घरातील कर्ता व्यक्ती मयत झाल्यानंतर कुटूंबाची पारस्तीति बिकट होते, ही बाब नाकारता येत नाही. तसेच ज्या महिलांचे पती हे कोरोना सारख्या भयंकर महामांरीने मृत्यु पावले आहेत परंतु कांही विधवा महिलांचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त आहे अशा सर्व विधवा महिलांना सदर योजनेचा लाभ मिळण्या साठी ५० वर्षे वयाची अट शिथील करणे गरजेचे आहे.
तरी सदरची मागणी रास्त असून सदर योजने अंतर्गत जास्तीत जास्त विधवा महिलांना आर्थिक सहाय्य लाभल्याने त्यांच्या कुटुंबास हातभार लागणार आहे. असे उपमहापौर (नानी) हीराबाई घुले यांनी निवेदना द्वारे आयुक्ताना म्हटले आहे.