दागिने, सोन ,साफ करण्याची कामे करतो सांगून चांदीची मूर्ती साफ केली ...नंतर....दागीने घेऊन पसार



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

 पिंपरी चिंचवड़ :  चाकण :   आमच्याकडे भांडी, दागिने साफ करण्याची पावडर असल्याचे सांगून दोघांनी एका महिलेची चांदीची मूर्ती साफ करून दिली. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी घेऊन दोघेजण निघून गेले. याबाबत महिलेने फसवणुकीची फिर्याद दिली आहे. ही घटना शिव छत्रपती हाऊसिंग सोसायटी, येलवाडी येथे घडली. याप्रकरणी महिलेने गुरुवारी  चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने घरातील 65 हजार रुपये किमतीचे 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपींकडे साफ करण्यासाठी दिले. आरोपी फिर्यादी महिलेचा विश्वासघात करून सोन्याचे दागिने घेऊन निघून गेले.तरी नगरिकांनी सतर्क रहाणे गरजेच आहे,आशा घटना नेहमी घटत असतात,   चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post