प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़ :वाकड मधून घराच्या उघड्या दरवाजा वाटे एक मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरीला गेला,तर भोसरी परिसरातुन मधून मेडिकल दुकानातून एक मोबाईल फोन चोरीला गेला आहे. आंबेठाण चौक चाकण येथून अज्ञात चोरट्यांनी एका कारचा सायलेन्सर चोरून नेला.
*पहेली चोरी*
वाकड येथील घटनेत कुंडलिक लक्ष्मण रूपणवर (वय 31, रा. मुंजोबानगर, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. 20) सकाळी सात ते सव्वासात वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून 10 हजारांचा मोबाईल व 35 हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
*दूसरी चोरी*
भोसरी पोलीस ठाण्यात 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे संत तुकाराम नगर, भोसरी येथे गायत्री मेडिकल शॉप आहे. शनिवारी (दि. 18) रात्री साडेसात ते आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या मेडिकल मध्ये काउंटरवर ठेवलेला 10 हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
*तीसरी चोरी*
चाकण येथील घटनेत गणेश हनुमंत शेवकर (वय 34, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. शेवकर यांनी त्यांची इको कार रविवारी (दि. 19) रात्री आंबेठाण चौक, चाकण येथे पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचा 15 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर काढून चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.