सव्वाशे कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड़ महानगरपालिकेत कायम करण्यास मंजूरी



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली नजीर शेख

 पूर्व पीसीएमटी मधील सव्वाशे कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्यात गुरुवारी पीएमीएमएलच्या पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

पूर्व पीसीएमटीतील कार्यशाळे मधिल चतुर्थश्रेणी कर्मचारी व चालक पदावरील काही कर्मचारी असे एकूण सव्वाशे कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सेवा करीत होते या कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post