प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवर अली शेख :
पुणे :राजगुरूनगर – हॉटेलमध्ये जेवण करताना किरकोळ वादातून खुना पर्यंत पोहचले चुलत भाऊ, दुचाकीवरून जाताना एकाने दुसर्याचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला, ही घटना शनिवारी दि. ११ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिरोली रस्त्यावर घडली. याप्रकरणी एकावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. दरम्यान, खेड तालुक्यात एकामागून एक सततच खून होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रमजान आदम भाई शेख रा. किवळे, ता. खेड असे खून झालेल्याचे नाव आहे. तर रफिक पमा शेख रा. आहिरे, ता. खेड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर चंद्रकांत सुदाम शिवले यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत सुदाम शिवले, मयत रमजान शेख, रफिक शेख हे शनिवारी एका हॉटेलामध्ये जेवून घराच्या दिशेने दुपारी पाच वाजता शिवले याच्या मोटार सायकलवर ट्रिपल सीट चांदूस येथे जात होते.
रस्त्यावरील एका पोल्ट्री फार्म दरम्यान जात असताना रफिक शेखने धारदार हत्याराने रमजान शेख यांचे गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. गळ्याला गंभीर जखम झाल्याने रमजान शेख यांचा जागीच मूत्यू झाल्यानंतर रफिक शेख तेथून पळून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड करीत आहे.