क्राईम न्यूज : तलाठी पतीनं आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड़ दि ८ सप्तेंबर पुण्यानजीक असणाऱ्या भोसरी  परिसरात एका तलाठी पतीनं आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या पत्नीवर आधी चाकूनं हल्ला केला आणि त्यानंतर हातोडीनं डोक्यात जबरी वार करत तिची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर घटनास्थळी चिठ्ठी लिहून तलाठी पती फरार झाला असून एमआयडीसी भोसरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मृत  पत्नी सरला ,आणि विजय यांचा 2019 मध्ये प्रेम विवाह झाला होता मात्र पती कायम सरला हिच्यावर संशय घेत असल्याने त्याची भांडणे होत होती .

काही महिन्यांपूर्वी दोघांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी याठिकाणी एक फ्लॅट विकत घेतला होता आणि शनिवारी 4 सप्टेंबर रोजी या नवीन फ्लॅटची वास्तूशांती देखील करण्यात आली होती. पूजा झाल्यानंतर सरला आणि विजयकुमार हे दोघंही तिथेच मुक्कामी थांबले होते आणि याच ठिकाणी विजयकुमारनं आपल्या पत्नीवर चाकूने वार केले आणि त्यानंतर डोक्यात हातोडी मारून त्यांची निर्घृण हत्या केली. भोसरी एमआयडीसी पोलीस  या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post