प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे; पिंपरी चिंचवड़ ११सपेंबर : मागील आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. आगामी पाचही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
आता राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.त्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे.दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळपासून पावसाच्या संततधार सरी सुरू झाल्या. दरम्यान काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे आता शेतमालाची नुकसान होणार नाही,याची काळजी घेण्याची गरज आहे. उद्यापासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पुण्यात आजपासून पुढचे ३ दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.या कालावधीत पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.तसेच पुण्याबरोबर सातारा, कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे,या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान आकाशात विजांचा कडकडाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी मोठ्या झाडाखाली उभं राहू नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.