शहरात एकाच दिवशी तीन खुनाच्या अतिधक्कादायक घटना घडल्याने खळबळ


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड : शहर पोलीस हद्दीत एकाच दिवशी तीन खुनाच्या  धक्कादायक घटना घड़ल्या, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे, हिंजडी ,निगडी , देहूरोड़ येथे खुनाच्या घटना घडल्या आहेत. दोन खुनाच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली असून हिंजवडी खून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

*पहिली घटना*

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूस येथे एकाचा खून झाल्याची माहिती मिळाली आहे.

*दूसरी घटना*

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओटास्कीम येथे पाच जणांनी मिळून एका व्यक्तीचा  खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास घडली.

भांडनाता मध्यस्थ आले त्या कारनावरुण ही घटना घडली असे सूत्रा कडून माहिती मिळाली, या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे,

*तीसरी घटना*

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली. सोमवारी सकाळी घोरावडेश्वर डोंगरावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चूलत दिराला अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post