आझादी का अमृत महोत्सवा*’चे आयोजन, १ ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली :शेख

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने  *आझादी का अमृत मोहत्सवाचे आयोजन, १ ते ३ ऑक्टोबर २०२१  या कालावधीत  करण्यात आले आहे. हा महोत्सव भारतीय नागरिकांना समर्पित करण्यात आला असून भारतीय नागरिकांच्या योगदानामुळेच भारत आपल्या दीर्घकाळाच्या प्रवासामध्ये हा महत्त्वाचा टप्पा गाठू शकला आहे. या निमीत्ताने **आझादी का अमृत महोत्सव** हा कार्यक्रम देशातील नागरिकांसाठी सलग  ७५ तास विविध उपक्रमांच्या माध्यमातून २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर १२ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.

प्रगतीशील भारताची ७५ वर्षे, भारत, भारतीय नागरिक, भारतीय संस्कृती आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचे विविध क्षेत्रांमधील यश यांचे स्मरण व्हावे, यासाठी भारत सरकारच्या वतीने **आझादी का अमृत महोत्सव** हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.भारतीय संस्कृती, देशाचा दैदिप्यमान इतिहास स्मरण करण्यासाठी शहरवासीयांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.


.                    प्रेस मीडियाचे पनवेलचे

                    दबंग पत्रकार .श्री सुनील पाटील .

यामध्ये, सायक्लोथॉन, वॉकथॉन, रनथॉन, रक्तदान शिबीर, अवयव दान, आरोग्य तपासणी शिबीर (ज्येष्ठ नागरिक), पथनाटय, कथाकथन, संगित संध्या (ऑर्केस्ट्रा), चित्रकला व निबंध स्पर्धा, संगीत स्पर्धा, योग सत्र/ झुम्बा, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, कौशल्य विकास, महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण, वॉल पेंटिंग, प्लेस मेकिंग, जलसंवर्धन जनजागृती, वेबीनार आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post